16 सप्टेंबरची शासकीय सुट्टी रद्द; अनंत चतुर्दशी असल्याने महाराष्ट्र सरकारने केला तारखेत बदल

Government Holiday | राज्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. यंदा विकेंडच्या दिवसांना लागून येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण यावेळी बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात.
येत्या मंगळवारी अनंत चतुर्दशी असून ११ दिवसांच्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. तर सोमवारी ईद-ए मिलाद सण आहे. मात्र यादिवसाची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. Government Holiday |
ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी
सोमवारी 16 सप्टेंबर रोजी यंदा ‘ईद मिलाद उन- नबी आहे. यासाठी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली होती. ईद-ए मिलाद हा मुस्लिम धार्मियांचा सण आहे. यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे.
ईद-मिलाद-उन-नबी हा दिवस पैंगबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. इस्लाममध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव जुलुस या कार्यक्रमाचे आयोजन करतात. Government Holiday |
दरम्यान, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये बुधवार जुलूस कार्यक्रम करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवानी घेतला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर याव्यतिरिक्त राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, असं प्रशासन विभागाने कळवले आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. Government Holiday |
हेही वाचा:
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा





