MSRTC strike: ‘ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय’

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.
हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला दिला असून यावरून राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. मात्र अद्याप विलीनीकरणाच्या मागणीवर शासनाने तोडगा काढला नाही. यावर चित्रा वाघ यांनी टिका केली आहे.
काय आहे चित्र वाघ यांचे ट्विट
ऐन दिवाळीत २ हजार #ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय..
नोकरी घालवणं..
उपाशी मारणं..
बेघर करणं..
आत्महत्येस प्रवृत्त करणं..हाच का #MVA चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?
हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय#निलंबन_सरकार चा धिक्कार असो!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 12, 2021




