satara | माती आणि जनतेचे ऋण फेडण्याची संधी मिळाली

सातारा, (प्रतिनिधी) – कृष्णेचे पाणी माणगंगेतून वाहिल्याने आपले सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी मी 15 वर्षे संघर्ष केला. मतदारसंघातील जनता आणि माताभगिनींचे आशीर्वाद कायमच राहिल्याने संघर्षासाठी बळ मिळाले. मातीचे आणि जनतेचे ऋण फेडण्याची संधी आज मला मिळाली, असे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
माणगंगा नदीवरील दहिवडी येथील श्री श्री बंधार्यावरुन वाहणार्या पाण्याच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. अॅड. भास्करराव गुंडगे, अतुल जाधव, दिलीप जाधव, साधना गुंडगे, सिद्धार्थ गुंडगे, लक्ष्मणराव जाधव, पंडूअण्णा जाधव, धनाजी जाधव, सतीश जाधव, प्रदीप जाधव, विशाल घोरपडे, शरद जाधव, संदीप जाधव, महेश कदम, दत्ता देशमाने, राजू इंगवले, अरुण जाधव,
सोहेल शेख, किशोर साळुंखे, विजय काशीद, प्रीतम खोत, सागर सावंत, अक्षय नाळे, विकास शिंगाडे, दादा शिंगाडे, आनंदा दडस, रमेश जाधव, अमित जगदाळे, जगन्नाथ जगदाळे, तानाजी गलांडे, सतीश गलांडे, किरण जाधव, किरण नाळे, मनोज नाळे, स्वप्निल मोरे, सुहास नाळे, दिनेश दवे, प्रशांत वायदंडे, अतुल शिंदे, तेजस पवार, कुंदन चव्हाण,
विकी चव्हाण, साकेत जाधव, हेमंत कुलकर्णी, नंदू कुलकर्णी, अजय खरात, रुद्रलिंग साखरे, विनायक साखरे, माजी नगरसेविका नीलम जाधव, उज्ज्वला पवार, राणी अवघडे, आजी-माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, माण-खटावला पाणी येणारच नाही, असे राज्यातील बडे नेते म्हणायचे. इथल्या जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी 15 वर्षांपूर्वी संघर्ष सुरू केला. जनतेने आणि माताभगिनींनी सुरुवातीपासून माझ्या पाठीशी आशीर्वादांचे बळ उभे केले. या वाटचालीत अनेक आव्हाने आली. या मातीतील काही नतद्रष्टांचा विरोध झाला. मात्र मी प्रत्येक टप्प्यावर उद्दिष्ट पूर्ण करत वाटचाल सुरू ठेवली.
दहा वर्षांपासून येणार्या उरमोडीच्या पाण्याने या भागात बदल घडवून आणले. आता जिहे-कठापूरचे पाणी आंधळी धरणातून म्हसवड, देवापूर, राजेवाडीपर्यंत झेपावणार आहे. एका महिन्यात हे पाणी माणच्या उत्तर भागातील 32 गावांची तहान भागवणार आहे. साडेसातशे कोटींच्या टेंभू योजनेचे भूमिपूजन होऊन, 42 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागत आहे.
औंधसह वीस गावांचा पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आहे. विविध पाणी योजनांसाठी आतापर्यंत दहा हजार कोटींवर निधी खर्च झाला आहे. पुढील तीन वर्षानंतर मतदारसंघाला दुष्काळी म्हणायची हिंमत कुणी करणार नाही.
माता-भगिनींचा उत्साह
पाण्याचे पूजन सुरू असताना वरुणराजाने दमदार हजेरी लावली. या पावसातही माता-भगिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता. आ. गोरे यांनीही पाण्यात उभे राहून भाषण केले. हा बंधारा कायम तुडुंब भरलेला रहणार आहे. दहिवडीच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहणार आहे. चार महिन्यांत नदीकाठी घाट बांधून बगीचासाठी पाच कोटींचा निधी देण्याचे आ. गोरेंनी जाहीर करताच सर्वांनी जल्लोष केला.



