Satara | माण तालुक्यासाठी 26 कोटींचा निधी

सातारा, (प्रतिनिधी) – आ. जयकुमार गोरे; पुरवणी मागण्यांमध्ये अनेक कामे मंजूरआ. जयकुमार गोरे; पुरवणी मागण्यांमध्ये अनेक कामे मंजूर राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने माण तालुक्यातील कामांसाठी 26 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तालुक्यात 40 तलाठी कार्यालये, व्हीआयपी विश्रामगृह आणि रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
आ. गोरे म्हणाले, तालुक्यात 40 तलाठी कार्यालये बांधण्यासाठी सहा कोटी आणि दहिवडी येथे व्हीआयपी विश्रामगृहासाठी तीन कोटी 19 लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. शिंगणापूर-वडूज राज्यमार्गावर डंगिरेवाडी फाटा-वावरहिरे घाट रस्ता सुधारणा, दिवडी-शिंदी घाट रस्ता सुधारणा (प्रत्येकी 75 लाख), बुध-दहिवडी राज्यमार्गावर कुळकजाई,
मलवडी, बिदाल गावाजवळ मोर्या (1.12 कोटी), नवलेवाडी-सत्रेवाडी रस्ता, आंधळी-बोराटवाडी रस्ता (प्रत्येकी 67 लाख), पुळकोटी-जांभुळणी रस्ता (1.34 कोटी), वळई-पाणवण रस्ता (1.34 कोटी), वडजल-वळई रस्ता, म्हसवड-मेगा सिटी रस्ता, धामणी फाटा-ढाकणी रस्ता, पिंपरी-ढाकणी रस्ता,
वळई-विरळी रस्ता भौमितिक सुधारणा आणि मजबूतीकरण (प्रत्येकी 1.67 कोटी) व येळेवाडी-पांगरी रस्ता (33 लाख), या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मतदारसंघातील कामांसाठी प्रत्येक अधिवेशनात भरघोस निधी मिळवण्यात यश आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मतदारसंघातील कामांना मोठा निधी मिळाला आहे.





