अखेर बंडखोरी थंडावली ! गोपाळ शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज मागे ; विनोद तावडेंच्या प्रयत्नांना यश

Gopal Shetty application back । राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आज राज्यात बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचा दिवस आहे. कारण आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत दोन्ही आघाड्याकडून बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झालीय. मात्र आज ही बंडखोरी करणारे कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात पहिली बंडखोरी थोपवण्याची बातमी बोरिवलीमधून समोर आली आहे.
बोरिवलीतून गोपाळ शेट्टी अर्ज मागे घेणार Gopal Shetty application back ।
राज्यातील राजकीय पक्षांकडून बंडखोरांची मनधरणी, अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत गोपाळ शेट्टी आणि स्वीकृती शर्मा अर्ज मागे घेतात का याची उत्सुकता होती. अखेर विनोद तावडें यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. बोरिवलीतून गोपाळ शेट्टी, अंधेरीतून स्विकृती शर्मा यांनी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपकडून बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न होताना दिसताय. मुंबईतल्या बोरिवलीतून गोपाळ शेट्टींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना माघार घेण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र गोपाळ शेट्टी निवडणूक लढण्यावर ठाम होते. काल फडणवीसांनींही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
विनोद तावडेंच्या प्रयत्नांना अखेर यश Gopal Shetty application back ।
दरम्यान आज विनोद तावडे गोपाळ शेट्टींच्या भेटीसाठी दाखल झाले. अखेर तावडेंच्या शिष्टाईला यश आले आङे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने गोपाळ शेट्टी काय निर्णय गेणार याकडे लक्ष लागले होते.दरम्यान, राज्यातली विधानसभा निवडणूक अवघ्या २ आठवड्यावर आली आहे. त्यामुळे बंडखोरांना रोखण्याचे आता सर्वांचे प्रयत्न असणार आहेत .
हेही वाचा
मोठी बातमी ! मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार…





