केडगावातून माल ट्रक चोरीला
Updated On:
नगर – मोकळ्या जागेत उभा केलेला माल ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना केडगाव येथील हॉटेल वंदनाजवळ घडली. या प्रकरणी मयूर प्रकाश बडे (रा. ओंकारनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माल ट्रक (एमएच 16 सीसी 1086) हा बडे यांच्या गणेश ट्रान्सपोर्ट जवळील हॉटेल वंदनाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत उभा केलेला होता.





