Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

कारभारी चांगला तर विकासकामे सुसाट

by प्रभात वृत्तसेवा
September 14, 2019 | 5:54 pm
A A
कारभारी चांगला तर विकासकामे सुसाट

शिवाजी आढळराव पाटील : खेड पंचाय समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

राजगुरुनगर – कारभारी चांगला असेल, तर विकास कामाला अडथळा येत नाही. विकासकामांना गतीच येते, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राजगुरुनगर येथे केले.

आमदार सुरेश गोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून व खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, अंकुश राक्षे या सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे आचार संहिता लागण्याआधी तब्ब्ल 5 कोटी रुपये निधी मिळवला. या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आढळराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.14)झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, महिला संघटक विजया शिंदे, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, बाबाजी काळे, निर्मला पानसरे, रूपाली कड, दीपाली काळे, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अंकुश राक्षे, अमर कांबळे, अमोल पवार, ज्योती अरगडे,नंदा सुकाळे, वैशाली जाधव, चांगदेव शिवेकर, अरुण चौधरी, सुनीता सांडभोर, मच्छिंद्र गावडे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, सुरेश चव्हाण, गणेश सांडभोर, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शेखर शेटे, मारुती सातकर, नंदा कड, उपअभियंता सुरेश कानडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, खेड शहर उत्तर पुणे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. या शहराला न्याय देण्याचे काम शिवसेना-भाजप ने केले. गेले अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत शहर होते. तो प्रश्‍न या सरकारने सोडवला. शहराची लोकसंख्या वाढली त्यामुळे अनेक आडचणी वाढल्या त्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रस्त्यांचे जाळे खेड तालुक्‍यात झाले. विकासाची घोडदौड आमदार गोरे यांनी सुरू केली आहे. ती निवडणुकीनंतरही कायम राहील. मला पराभवाचे शल्य नाही. मी लोकांमध्ये लोकांची कामे करण्यासाठी नव्या दमाने फिरत आहे. शिवसेना भाजपची ताकद माझ्या मागे कायम ठेवली आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम यापुढेही सुरू राहील. खेड तालुक्‍याने भरपूर दिले याचे उपकार विसरणार नाही.

आमदार गोरे म्हणाले की, नागरिकांसाठी गरजेच्या असलेल्या खेड पंचायत समितीला नवीन इमारत असणे गरजेचे होते. या इमारतीत तालुक्‍याचा प्रशासकीय कारभार केला जात होता. गेली 60 वर्षे जुनी इमारत होती. 14 विभाग या इमारतीत काम करीत होते. आलेल्या नागरिकांना अपुरी जागा पडत होती. या इमारतीचे नूतनीकरण गरजेचे होते. नवीन इमारत बांधण्याची मागणी पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांनी केली. त्याला निधी मिळाल्याने सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार असल्याने तालुक्‍याचे वैभव वाढणार आहे. प्रत्येक नागरिकाला या इमारतीत असलेल्या विभागातून सर्व सुविधा आणि समाधान मिळेल. नागरिकांच्या सर्व गरजा आणि पुढील 50 वर्षे या इमारतीतून कामकाज होईल, अशी बांधणी केली जाणार आहे. सर्व नागरिकांवर बारकाईने लक्ष असून त्यांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन कोकणे यांनी, तर गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी आभार मानले.

  • पंचायत समितीची जुनी व अपुरी इमारत झाल्याने आम्ही नवीन इमारत बांधण्याचे ठरवले, त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्री यांच्याकडे आमदार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. पाच कोटींचा निधी मंजूर झाला. अजूनहीसुमारे अडीच कोटींचा उर्वरित निधी मिळावा यासाठी आमदार गोरे यांच्या मदतीने पाठपुरावा केला जाणार आहे.
    – भगवान पोखरकर, उपसभापती, खेड तालुका
  • इमारत जुनी व अपुरी पडत होती.एप्रिल 2017 ला ठराव करून पंचायत समितीने पाठपुरावा केला आमदार सुरेश गोरे यांच्या माध्यमातून 5 कोटींचा निधी मंजूर झाला 22 जुलै ला तांत्रिक मान्यता मिळाली.सर्व परवानग्या घेतल्या असून काम लवकर सुरू करण्यात येणार सुरुवातीला पार्किंग व पहिला मजला करणार.नैसर्गिक वातावरण ठेवून बांधकाम करण्यात येणार.
    – सुरेश कानडे, उपअभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती खेड

शिफारस केलेल्या बातम्या

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा
क्रीडा

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

52 mins ago
उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

2 hours ago
बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री
Top News

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

2 hours ago
शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी
महाराष्ट्र

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

2 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

#INDvENG 5th Test : …म्हणून बुमराहकडे नेतृत्व, संघ व्यवस्थापनाने दिला खुलासा

उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली; पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केली नाराजी

बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; फडणवीस उपमुख्यमंत्री

शिंदे गटाचा ‘शिवसेने’वर दावा; शिवसेना आमदारांना व्हीप जारी

शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्याने फडणवीस नाराज? केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर स्वीकारणार ‘उपमुख्यमंत्री’पदाची जबाबदारी

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले”अजून एका..”

मुख्यमंत्रीपद हिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांनी पद व पक्ष दोन्ही काढून घेतले?

सरकार एकनाथ शिंदेंचं, रिमोट कंट्रोल आता देवेंद्र फडणवीसांकडे ?

आज फक्त एकनाथ शिंदेंचाच शपथविधी होणार; मात्र शपथविधीला…

आजपासूनच भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभा राहणार; राष्ट्रवादीचा स्पष्ट इशारा

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!