Good News! झायडस कॅडिलाच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी; 12 वर्षांवरील मुलांनादेणार लस

नवी दिल्ली : भारतातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला यश मिळू शकते. झायडस कॅडिलाच्या करोना लसीला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळू शकते. असे झाल्यास, भारतात वापरली जाणारी ही सहावी लस असणार आहे.
विशेष म्हणजे झायडस कॅडिलाची लस 12 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांसाठी असू शकते. झायडसच्या या लसीला मुंजुरी मिळाल्यास, 12 ते 18 वर्षांतील मुलांसाठी ही देशातील पहिलीच व्हॅक्सीन असेल. अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीने जगातील पहिली DNA बेस्ड कोविड लस बनवली आहे. चाचणीमध्ये त्याच्या यशाची टक्केवारी 77 टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली आहे.
आतापर्यंत भारतात एकूण 5 लसींना मंजुरी देण्यात आली आहे. यांपैकी कोविशील्ड कोवॅक्सिन आणि स्फुटनिक-व्ही या तीन लसी देशभरात वापरल्या जात आहेत. याशिवाय, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन (सिंगल डोस) लसींना मंजुरी मिळाली आहे. तर आता झायडस कॅडिलाला मंजुरी मिळाल्यास ती देशातील सहावी लस असेल. भारतात आतापर्यंत 50 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.




