दिलासादायक बातमी.! महाराष्ट्रातील करोना रुग्णसंख्या पोहोचली….

मुंबई – शेजारच्या चीनमध्ये करोनाचा जो नवा अवतार अर्थात व्हेरियंट आढळला आहे, त्यामुळे जगात आणि भारतातही काहीसे काळजीचे वातावरण आहे. हा व्हेरियंट किती धोकादायक असेल याचा विचार आणि तपासणी केली जाते आहे. सध्या चीनमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. चीनमध्ये अनेक लोकांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. आणि त्यामुळेच आता भारतात देखील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
अद्याप तरी भारतात परिस्थिती दिलासादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, तरी देखील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. असं आरोग्य विभाकडून सांगण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे तसेच बूस्टर डोस घेण्याचं आवाहन देखील केंद्र सरकार आणि आरोग्य विभाग करत आहे.
दरम्यान, आता महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मागील पंधरा दिवसामध्ये राज्यात 1574 रुग्णसंख्येची नोंद झाली असून तेरा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, पॉझिटिव्हिटी दर हा 0.05 टक्क्यांच्या खाली असल्याचे दिसते.
राज्यातील सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये रोज वीस ते तीस रुग्णसंख्येची नोंद होत असून डिसेंबरच्या तुलनेमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने खाली आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर, सध्या जे रुग्ण येतात त्यांना खोकला, सर्दी, घसादुखी या स्वरुपाची लक्षणे दिसून येतात. असं देखील म्हंटलं आहे.





