गुडन्यूज! SBIचा ग्राहकांना मोठा दिलासा; स्वस्त केले कर्जाचे व्याजदर, ‘या’ तारखेपासून होणार लागू

SBI Bank | स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एसबीआयने 25 बेसिस पॉईंटने व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या आठवड्यात रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी करुन 5.25 टक्क्यांवर आणला होता. कर्जदारांना त्याचा फायदा देण्यासाठी एसबीआयनं हा निर्णय घेतला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याज दरात कपात केल्यानं एक्सटर्नल बेंच मार्क लिंक्ड रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी होऊन 7.90 टक्क्यांवर आला आहे. हे दर 15 डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क-लिंक्ड रेट (EBLR) ७.९०% होईल. सध्या बँकेत कर्जाची सुरुवात ८.१५% ने होते, जी १५ डिसेंबरनंतर ८% पेक्षाही कमी होईल.
या दर कपातीचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. पर्सनल लोन, वाहन कर्ज आणि गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता कर्जाचा ईएमआय (EMI) कमी भरावा लागेल.
RBI कडून चौथ्यांदा रेपो रेपोटमध्ये कपात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2025 या कॅलेंडर वर्षात चौथ्यांदा रेपो रेपोटमध्ये कपात केली आहे. त्यामुळं रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 5.25 टक्क्यांवर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिंग रेट मध्ये सर्व प्रकारच्या कालावधीच्या कर्जासाठी व्याज दर 5 बेसिस पॉईंटनं कमी केला आहे.
SBI च्या FD दरांमध्येही बदल
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने मुदत ठेवीच्या व्याजदरातही बदल केला आहे. २ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी व्याजदर ६.४०% झाले आहेत. याशिवाय, ४४४ दिवसांच्या योजनेचे व्याजदर ६.६०% वरून कमी होऊन ६.४५% झाले आहेत. इतर मॅच्युरिटी असलेल्या एफडीच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात केल्यानं आणखी काही बँकांनी व्याज दरात कपात केली आहे. एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडियासह इतर बँकांनी गृह कर्जाच्या व्याज दरात कपात केली.
- एचडीएफसी बँकेनं एमसीएलआर बेस्ड कर्जाचा व्याज दर 5 बेसिस पॉईंटनं कमी केली आहे. एचडीएफसी बँकेची एमसीएलआर रेटची रेंज 8.30 टक्के ते 8.55 टक्के असेल. हे व्याज दर कर्जाच्या कालावधीवर अवलंबून असतील.
- पंजाब नॅशनल बँकेनं रेपो लिंक्ज लेंडिंग रेट 8.35 टक्क्यांवरुन 8.10 टक्क्यांवर आणला आहे. बँक ऑफ इंडियानं बेंचमार्क रिटेल लोन लेंडिंग रेट 8.15 टक्क्यांवरुन 7.90 टक्क्यांवर आणला आहे.
- इंडियनं बँकेनं रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट 8.20 टक्क्यांवरुन 7.95 टक्क्यांवर आणला आहे.
हेही वाचा:




