good news : अभिनेत्री ‘सोनम कपूर’च्या घरी नवीन पाहुणा

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर काही दिवसांपूर्वीच भारतात परतली आहे. मायदेशी परतल्यानंतर सोनम कपूरच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या समोर आल्या. परंतु सोनम कपूरने हे वृत्त फेटाळून लावले. त्यातच आता सोनम कपूरने आपल्या घरी आलेल्या एका नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे.
सोनमने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती एका सुंदर अशा कुत्र्यासोबत दिसत आहे. या फोटोत ती खूपच आनंदी असल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, मी आपल्या सर्वांसमोर कपूर परिवारातील एका नवीन सदस्याला सादर करत आहे, रसेल क्रो कपूर. येथे पाहा त्याच्यासोबतच्या आनंदी क्षणाची एक झलक.
सोनम कपूरचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोवर असंख्य चाहत्यांनी कमेंटस् करत सोनम कपूरला नवीन डॉगीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दरम्यान, लग्न झाल्यापासून सोनम कपूर ही आपला पती आनंद आहूजासह लंडन येथे राहत आहे. ती सतत आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भारतात येत असते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द जोया फॅक्टर’मध्ये ती अखेरच्या वेळी झळकली होती.





