Champion Trophy : टीम इंडियासाठी खुशखबर! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ‘हा’ गोलंदाज झाला फिट; लवकरच करणार पुनरागमन

चॅम्पियन्स ट्रॉफीला 20 दिवस शिल्लक राहिले आहेत. या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे संपूर्ण क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. यादरम्यान भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव फिट झाला आहे. तो लवकरच पुनरागमन करू शकतो. सर्जरी झाल्यामुळे ऑक्टोबर पासून क्रिकेटच्या मैदानावर न उतरलेला कुलदीप यादव रणजी सामन्यात उत्तर प्रदेशच्या एलीट ग्रुप C कडून खेळत आहे.
गोलंदाज कुलदीप यादवने शेवटचा सामना हा ऑक्टोबर महिन्यात टेस्ट क्रिकेट न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू येथे खेळला होता. दरम्यान गोलंदाजी करताना त्याची कंबर आणि ग्रोइनची जुनी दुखापत पुन्हा झाली ज्यातून बरं होण्यासाठी त्याला जर्मनी येथे जाऊन शस्त्रक्रिया करावी लागली. या दुखापतीतून सावरण्यासाठी कुलदीप यादवला प्रथम बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले. तपासणी केल्यानंतर एनसीएच्या डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी जर्मनीला पाठवण्याचा सल्ला दिला, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी कुलदीप यादवचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला आहे.
दिल्ली कॅपिटल्समधून खेळणार कुलदीप
30 वर्षांचा कुलदीप यादव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. दिल्ली संघाने त्यांना आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केले. यासाठी त्यांनी कुलदीपवर 13.25 कोटी रुपये खर्च केले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया (Champions Trophy 2025 India squad)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपूर्ण वेळापत्रक….
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची)
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)





