cashback | liquor : मद्यसेवन आरोग्यास हानिकारक असतं असं प्रत्येक मद्याच्या बाटलीवर लिहिण्यात येऊनही मद्यप्रेमी नेमके याच ओळीला बगल देतात. एकिकडे या मंडळीची चांदी असतानाच दुसरीकडे त्यांच्यामुळं मद्यविक्रेत्यांचीही चांदी होते. आता मात्र मद्य खरेदी करणाऱ्यांना बाटलीतीय पेय संपल्यानंतर थोडाथोडका का असेना फायदा मिळणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने प्लास्टिकपासून होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी 2 निर्णय घेतले आहेत. पहिल्या निर्णयात केरळ स्टेट बेव्हरेजेस कॉर्पोरेशन (बेव्हको) च्या आउटलेटमध्ये विकली जाणारी प्रीमियम दारू आता प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध होणार नाही. राज्यात 800 रुपयांहून अधिक दारूची बाटली काचेच्या बाटलीत विक्री केली जाईल. त्याशिवाय दुसऱ्या निर्णयात दारू खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून 20 रूपये अतिरिक्त घेतले जातील. ही रक्कम बाटली परत केल्यानंतर ग्राहकाला परत मिळतील. प्रत्येक बाटलीवर क्यूआर कोड लावला जाईल, ज्यामुळे रिफंड प्रक्रिया ट्रॅक करण्यास मदत होईल. परंतु रिफंड केवळ तिथूनच मिळेल जिथून बाटली खरेदी केली असेल असं सरकारने स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला तिरुवअनंतपूरम आणि कन्नूर इथं या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जात असून, सरकारच्या दारुविक्री आणि पॅकेजिंगशी संबंधित उपक्रमाची सुरुवात सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. पर्यावरणात होणारा प्लास्टीक कचरा कमी करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेवल्याचं राज्य शासनाकडून सांगण्यात आलं आहे. केरळात मद्याच्या बाटलीचं स्वरुपही बदललं? नव्या योजनेसह केरळ सरकारनं केलेल्या घोषणेनुसार 800 रुपयांहून कमी किमतीचं मद्य प्लास्टीकच्या बाटल्यांमध्ये विकलं जाईल. तर बेवकोच्या दुकानांवर विक्री केल्या जाणाऱ्या महागड्या मद्याच्या किमती 800 रुपयांहून अधिक राहणार असून, त्यांची विक्री मात्र काचेच्या बाटलीमध्ये केली जाणार आहे.