नवी दिल्ली – देशासह भातात देखील कोरोना विषाणूने आपले पाय पसरले आहे. त्यामुळे गेले तीन महिन्यांहून अधिक काळ झाला देशात लॉकडाऊन सुरु आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे सध्या नागरिक आर्थिक संकटात सापडले असले तरीही लॉनलाईन शॉपिंग मात्र मोठ्या प्रमाणात करत आहे.
लॉकडाऊनमुळे बाजारातील दुकाने बंद असली तरी शॉपिंग वेबसाईट चालू आहेत. त्यातही आता आनंदाची बातमी म्हणजे, अमेझॉन या नामांकित शॉपिंग वेबसाईट वर लवकरच मोठा डिस्काउंट सुरु होणार आहे. मात्र, हा डिस्काउंट फक्त आयफोन प्रेमींसाठी असणार आहे.
अमेरिकेची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपलने आपल्या पॉप्युलर iPhone 11 वर मोठी सूट दिली आहे. या सेलमध्ये iPhone 11 फक्त 62,900 रुपयांमध्ये मिळणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, iPhone 11 श्रेणी, Apple वॉच, MacBookवर सर्वात उत्तम ऑफर फक्त आम्ही देत आहोत. हा सेल शनिवार (18 जुलै)च्या रात्री 12 पासून ते 25 जुलैपर्यंत चालणार आहे.