चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा रणबीर-दीपिका एकत्र दिसणार

Ranbir-Deepika : दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील प्रतिभावान स्टार आहेत. जेव्हा जेव्हा हे दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतात, त्यावेळी प्रेक्षकांना भारावून सोडतात. बचना ए हसीनो, ये जवानी है दिवानी आणि तमाशा यांसारख्या सिनेमांमध्ये या जोडीने चाहत्यांना रोमान्स, भावना आणि वास्तविक जीवनाची अनुभूती दिली.
आता, बऱ्याच काळानंतर, ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र येण्यास सज्ज झाली आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत दिग्दर्शक अयान मुखर्जी जोडला जाणार आहे. रेडिटवरील चर्चेनुसार, रणबीर आणि दीपिका अयान मुखर्जीसोबत एका नवीन सिनेमासाठी चर्चा करत आहेत. राज कपूर यांच्या प्रसिद्ध आरके फिल्म्स अँड स्टुडिओजच्या बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे.
हेही वाचा : अंजली भाटी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! सोनाक्षी सिन्हाची लोकप्रिय वेबसिरीज दहाड 2 ची मोठी अपडेट समोर
अयान मुखर्जी आणि अभिनेत्री-दिग्दर्शिका कोंकणा सेन शर्मा सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. आरके फिल्म्स बऱ्याच काळापासून बंद आहे, परंतु आता डिसेंबर २०२५ पर्यंत पुन्हा सुरू होण्याची तयारी करत आहे आणि रणबीर-दीपिकाचा हा नवीन सिनेमा त्याच्यासोबत लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा अमेरिकेत घडणारी एक आधुनिक प्रेमकथा किंवा कौटुंबिक ड्रॅामा असणार आहे. ही कथा एका विवाहित जोडप्याची असून जी त्यांचे नाते, जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करते यावर भाष्य करणारी असणार आहे.
जर सगळे काही नियोजनानुसार झाले तर २०२६ च्या शेवटच्या महिन्यापर्यंत शूटिंगला सुरूवात केली जावू शकते. सध्या रणबीर कपूर रामायण आणि ब्रह्मास्त्र २ या दोन मोठ्या सिनेमांत व्यस्त आहे. दरम्यान, दीपिका पदुकोण ‘किंग’ आणि इतर प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दोघांच्या सिनेमाचे नाव काय असणार याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
हेही वाचा : ‘माझा पाठलाग करु नका…’; आमिर खानची गर्लफ्रेंड पापाराझींवर संतापली





