Parth Pawar : बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारतोफा उद्या 21 एप्रिल रोजी थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभेची आयोजन शारदा प्रांगणात करण्यात आले आहे. या सभेच्या आयोजनाची पाहणी राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी केली. यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एक मोठं वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ते पुन्हा एकादा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असले तरी अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. असे असले तरी सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित असून, ते किती मतांच्या लीडने येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काही लोकं उभे राहिले होते त्यांच्या अनेक मागण्या होत्या; पण काही लोकांना मुद्यामून उभं करण्यात आल्याचे मोठं विधान केले आहे. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. नेमकं काय म्हणाले पार्थ पवार? ( Parth Pawar) Parth Pawar : पार्थ पवार पुन्हा चर्चेत! काँग्रेसविषयीच्या त्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा मोठं वक्तव्य म्हणाले… “मला वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. दादा गेल्यानंतर ही खरंतर संधी होती. दादांबरोबर कोण आहे. अनेक लोकांची इच्छा होती ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. पक्षाच्या लोकांनी फोन लावले. काही लोकांना मागे घ्यायला लावलं, पण तशी ही निवडणूक बिनविरोध झालेलीच नाहीये. काही लोकं उभे राहिले होते, त्यांच्या अनेक मागण्या होत्या. पण काही लोकांना मुद्यामून उभं केले आहे.” हेही वाचा : Buttermilk Benefits: थकवा आणि अॅसिडिटीला रामराम! ताकात या गोष्टी मिसळा आणि मिळवा झटपट आराम