Kesar Mango : गुलटेकडीत ७५० ग्रॅमचा ‘गोल्डन’ केशर! आटपाडीच्या शेतकऱ्याचा डंका; मिळाला १२१ रुपयांचा उच्चांकी भाव
Kesar Mango : गुलटेकडी मार्केट येथे आज केशर आंब्याच्या अनोख्या ‘गोल्डन’ व्हरायटीने व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

Kesar Mango : गुलटेकडी मार्केट येथे आज केशर आंब्याच्या अनोख्या ‘गोल्डन’ व्हरायटीने व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तब्बल ७५० ग्रॅम वजनाच्या या केशर आंब्याला बाजारात मोठी मागणी निर्माण झाली असून, त्याला १२१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. (Kesar Mango)
हा विशेष माल मे. तुळजाराम पंथाराम बनवारी (काची) अडते यांच्या गाळ्यावर प्रथमच दाखल झाला होता. व्यापारी युवराज मोतीलाल काची यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गोल्डन’ नावाची ही केशर आंब्याची व्हरायटी अतिशय उत्कृष्ट दर्जाची असून तिच्या आकर्षक आकारामुळे आणि गुणवत्तेमुळे बाजारात व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. (Kesar Mango)
हा आंबा सुखदेव चव्हाण यांनी मेहनतीने जोपासला आहे. ते आटपाडी तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या आंब्याची लागवड आणि संगोपन केले. त्यांच्या मेहनतीचे चीज होत या मालाला आज बाजारातील सर्वाधिक भाव मिळाल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात रंगली. (Kesar Mango)
या वेळी बाजारात प्रकाश भडकुंबे, परेश शहा, सरफराज, सोनू बागवान, शरद कोकरे, बाळासाहेब जाधव, अन्वर शेख आणि अरविंद यादव यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते. व्यापारी परेश शहा यांनी या विशेष केशर आंब्याची उच्चांकी भावात खरेदी केली. (Kesar Mango)





