Gold-Silver Rates: सोने 52,051 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 55,979 रुपये प्रति किलो
Updated On:

नावी दिल्ली – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 254 रुपयानी कमी होऊन 52,051 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 21 रुपयांनी वाढून 55,979 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. (Gold-Silver Rates)
सोने व चांदी बाजारातील संमिश्र वातावरणाबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक आपण पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात होत असलेल्या घडामोडीचा परिणाम भारतीय बाजारावर होत आहे.
वायदे बाजारातील सोन्याच्या दराप्रमाणे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर कमी झाले. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,751 डॉलर व चांदीचा दर 19.22 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. (Gold-Silver Rates Updats)




