Gold Silver Prices Today: सोने घसरले; चांदी वधारली
Updated On:

नवी दिल्ली – सध्या जागतिक व्यापार युद्धामुळे सर्वच बाजारावर अनिश्चिततेची छाया आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी सोन्याचा भाव दोनशे रुपयांनी कमी होऊन 88 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. अखिल भारतीय सराफा संघटनेने जाहीर केलेल्या माहितीनुसार चांदीचा भाव मात्र पाचशेे रुपयांनी वाढून 99 हजार 500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
स्थानिक दागिने उत्पादकांनी सोन्याची मागणी कमी केल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे सांगितले जाते. तर औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढल्यामुळे चांदीचा भाव वधारला. वायदे बाजारात मात्र दोन्ही धातूचे दर वाढत आहेत. त्यामुळे मध्यम ते दीर्घ पल्ल्यात या दोन धातूचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.




