Gold silver prices today: सोने-चांदीत तुफान तेजी; आजचे ताजे दर जाणून घ्या…

नवी दिल्ली – अमेरिकेतील प्रशासन ठप्प होऊन एक आठवडा झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील आर्थिक मंदी दूर करण्यासाठी अमेरिका व्याजदर कपात करण्याची शक्यता आहे. अमेरिकन कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे.
अशा परिस्थितीत किमान लघु ते मध्यम पल्ल्यात सोने बाळगणे नफादायक ठरेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात आणि भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
दिल्ली सराफ आज सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 1 लाख 24 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर अगोदरच उच्च पातळीवर आहे. अशा परिस्थितीत काही प्रमाणात नफेखोरी झाल्यामुळे चांदीचा दर 3,400 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 54 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
अमेरिकेतील पेचप्रसंगाबरोबरच जपान आणि चीनमध्ये ही राजकीय पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे आकर्षण अधिकच वाढले असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. शिवाय रशिया- युक्रेन संघर्ष चालू आहे. त्यामुळे सोने आणि चांदी तेजीत आहे.




