Gold-Silver Prices: आखाती युद्धामुळे विविध बाजारपेठामध्ये स्थिर वातावरण निर्माण झाले आहे. सोने आणि चांदीचे दर सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे देशातील गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 1 हजार रुपयाने म्हणजे 0.62 टक्क्यांनी कमी होऊन 1 लाख 60 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 6,000 रुपयांनी म्हणजे 2.28 टक्क्यांनी कमी होऊन 2 लाख 56 हजार 500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अमेरिकेचे पतधोरण या आठवड्यात जाहीर होणार आहे. याकडे देश – विदेशातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. खनिज तेलाचे दर इतर देशाप्रमाणेच अमेरिकेतही वाढले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेतही महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदर जैसे थे पातळीवर ठेवेल असे समजले जात आहे. हेही वाचा – गॅस टंचाईमुळे नागरिकांचा ‘इन्स्टंट’ जेवणाकडे कल; पाकीटबंद खाद्यपदार्थांच्या मागणीत 15 टक्क्यांनी वाढ सध्या तरी सोने, चांदी आणि शेअरपेक्षा डॉलर आणि अमेरिकेतील कर्जरोख्यात जास्त गुंतवणूक होत आहे. एकूण परिस्थिती पाहता सोने आणि चांदीचे दर दीर्घ पल्ल्यात उच्च पातळीवर राहण्याची जास्त शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.