व्यापार युद्धामुळे सोन्याचा दर विक्रमी उच्चांकावर; चांदीत नफेखोरीमुळे घसरण
Updated On:

नवी दिल्ली – व्यापार युद्ध भडकल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी सोन्याचा दर 2,100 रुपयांनी वाढवून 1 लाख 3 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर गेला. काल चांदीचा दर नव्या विक्रमी पातळीवर गेला होता.
अशा परिस्थितीत देशातील काही गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. त्यामुळे शुक्रवारी चांदीचा दर 1 हजार रुपयांनी कमी होऊन 1 लाख 19 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अमेरिकेत फेडरल रिझर्ववर व्याजदर कपातीसाठी दबाव आहे. अशा परिस्थितीत व्याजदर कपातीची शक्यता आहे. त्यामुळेही सोने आणि चांदीच्या दरात गेल्या एक आठवड्यापासून वाढ होत आहे.





