सराफा दुकानदार मोबाईल पाहत बसला अन् भामट्याने सोनसाखळी घेऊन ठोकली धूम; घटना CCTVत कैद

Updated On:

जुन्नर – जुन्नरमध्ये भरदिवसा सराईपेठ येथील दुकानात सोन्याची चैन खरेदी करायची आहे सांगून अडीच तोळे वजनाची अंदाजे सव्वा लाख रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून भामटा पळून गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी आहे, जुन्नर मधील सराईपेठ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समोर पांडुरंग नथुशेठ काजळे यांचे सराफा दुकाण आहे.  दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास अंदाजे २५ ते ३० वयाचा अंगामध्ये लाल रंगाचा टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला, डोक्यास रूमाल बांधलेला आणि तोंडावर मास्क बांधलेला अनोळखी इसम दुकानात आला.  मला सोन्याची चैन खरेदी करावयाची आहे असे सांगितले.

दुकानदाराने चैन दाखवल्यानंतर तो दुकानातील आरशासमोर उभे राहून गळ्यात चैन घालून पाहत होता. त्यावेळी दुकाणदार आशिष काळजे हे मोबाईल पाहत असल्याचे पाहून भामट्याने धूम ठोकली.  आशिष काजळे यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो इसम पळून जाण्यात यशस्वी झाला.
याप्रकरणी शैलेंद्र देविदास काजळे यांनी फिर्याद दिली असून जुन्नर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सराईपेठ येथील मंदिराजवळ एका वृद्ध महिलेस आईच्या नावाने दान करावयाचे आहे ते तुम्ही करा असे सांगत हातचलाखीने दोन तोळे वजनाची सोन्याची माळ अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती.

आणखी संबंधित बातम्या

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

2026-10-08 19:31:12

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट