गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी महागले; ग्राहकांच्या खिशाला फटका, जाणून घ्या आजचे दर

Gold Rate Today | आज गुढीपाडव्यानिमित्त नव्या वस्तू, सोन-चांदी खरेदीसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर राज्यात सोने-चांदीच्या खरेदीची उलाढाल 5 हजार कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने 90 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
सातत्याने वाढत असलेल्या सोन-चांदीच्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड झाला आहे. या आठवड्यातही सोन्याने मोठी झेप घेतली आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात सोने 540 रुपयांनी स्वस्त झाले. तर बुधवारी 110, गुरूवारी 440 आणि शुक्रवारी 1140 रुपये असे एकूण 1690 रुपयांनी सोने महागले.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 83,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 91,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
तर आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 89,164, 22 कॅरेट सोने 81,674 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,873 रुपये, 14 कॅरेट सोने 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. Gold Rate Today |
चांदीचा भाव किती ?
एक किलो चांदीचा भाव देखील १ लाख ५ हजारांवर पोहचली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसात चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही. त्यानंतर तीन दिवसात चांदी ४००० रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,000 रुपये इतका आहे. Gold Rate Today |
हेही वाचा:





