गोकुळचा मोठा निर्णय! ‘हे’ दोन नवे प्रॅाडक्ट बाजारात आणणार; वार्षिक सभेच्या व्यासपीठावरून मुश्रीफांची घोषणा

Gokul General Assembly : गोकुळची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना या ठिकाणी पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यासपीठावरून अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे.
आता गोकुळ बाजारात दोन नवे प्रॅाडक्ट आणणार आहेत. चीज आणि आईस्क्रीम हे दोन नवे प्रॅाडक्ट आणणार आहे. आजच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत गोकुळनं हा मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुश्रफांनी या नव्या प्रॅाडक्टची घोषणा केल्यानंतर आता गोकुळ केवळ दूधच नव्हे तर चीज आणि आईस्क्रीम या वस्तूंचेही उत्पादन करणार आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला गोकुळ दूध उत्पादक संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच या सभेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार सतेज पाटील हे देखील उपस्थितीत होते. यावेळी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेत अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी जाहीर केलं की गोकुळ लवकरच बाजारात चीज आणि आईस्क्रीम हे २ नवे प्रॉडक्ट आणणार आहे.
गोकुळ नजीकच्या काळात २० लाख लिटरचा टप्पा पार करत असून, पुढील २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.





