Farooq Abdullah: ‘देवाने मला वाचवले’: लग्नात झालेल्या हत्येच्या प्रयत्नातून थोडक्यात बचावल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Farooq Abdullah: जम्मूच्या ग्रेटर कैलाश परिसरातील एका लग्न समारंभात हा थरारक प्रसंग घडला. कमल सिंग जम्वाल असे हल्लेखोराचे नाव असल्याचे सांगण्यात येते. फारूक अब्दुल्ला कार्यक्रमस्थळातून बाहेर पडत असताना हल्लेखोराने मागून गोळी झाडली.

Farooq Abdullah: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री जम्मूतील एका लग्न समारंभात जीवघेणा हल्ला झाला. मात्र सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ते बचावले. गुरुवारी पीटीआयशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले, “मी ठीक आहे. देवाने मला वाचवले.”
काय घडले रात्री? Farooq Abdullah
जम्मूच्या ग्रेटर कैलाश परिसरातील एका लग्न समारंभात हा थरारक प्रसंग घडला. कमल सिंग जम्वाल असे हल्लेखोराचे नाव असल्याचे सांगण्यात येते. फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) कार्यक्रमस्थळातून बाहेर पडत असताना हल्लेखोराने मागून गोळी झाडली. हल्ल्याचा थरार सांगताना फारूक अब्दुल्ला म्हणाले, “हल्लेखोर माझ्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटच्या क्षणी NSG सह सुरक्षारक्षकांनी त्याला काबूत आणले आणि मला लगेच गाडीत बसवून सुरक्षित ठिकाणी नेले.”
#WATCH | Jammu, J&K: An incident of firing occurred at a function where JKNC chief Farooq Abdullah and Deputy CM Surinder Choudhary were present. One person has been arrested. No injuries have been reported.
CCTV visuals showing the moment when the incident took place. pic.twitter.com/pnoD3f9fRJ
— ANI (@ANI) March 11, 2026
ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली चिंता – Farooq Abdullah
या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री व फारूक अब्दुल्लांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी X वर पोस्ट करत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “एक भरलेले पिस्तूल असलेला इसम Z+ NSG संरक्षण असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ कसा पोहोचला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. क्लोज प्रोटेक्शन टीमने गोळी झाडण्यापासून रोखले म्हणून हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला.” घटनेनंतर ओमर अब्दुल्ला जम्मूला पोहोचले आणि थेट वडिलांच्या निवासस्थानी गेले.
#WATCH | Jammu | Over assassination attempt on him, Farooq Abdullah says, “I don’t know what his (accused Kamal) intention was. To say it was a security lapse would be a big statement to make. Many big personalities were present at this wedding, but there was no police present.… https://t.co/0Ql2G8T65f pic.twitter.com/yBJeG7vqT2
— ANI (@ANI) March 12, 2026
सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह –
Z+ श्रेणीच्या सुरक्षा असूनही हल्लेखोर एवढ्या जवळ पोहोचला, यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वसाधारण नियमानुसार अशा उच्चपदस्थ व्यक्तींच्या उपस्थितीत परिसर संपूर्णपणे सुरक्षित केला जाणे आवश्यक होते. वरिष्ठ फारूक अब्दुल्ला यांनी सुरक्षेतील त्रुटींवर भाष्य करणे टाळले.
या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील केंद्र सरकारच्या सर्व संरक्षित व्यक्तींच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जात असून ताफ्यात वापरल्या जाणाऱ्या जॅमर्सच्या श्रेणीसुधारणेसह सुरक्षा अधिक कडक करण्याचे उपाय सुरू आहेत.





