‘देवाने तुला माझ्या कठीण काळात…’ सनी लिओनीने मानले पतीचे आभार

मुंबई – अभिनेत्री सनी लिओनी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर झळकली होती. यावेळी ती खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिचे ‘कॅनेडी’ चित्रपटातील भूमिकेचे देखील कौतुक करण्यात आले. यानंतर आता सनीने तिचा पती डॅनियलचे आभार मानत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
सनीने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “देवाने तुला माझ्या कठीण काळात माझ्याकडे पाठवले. त्यावेळी खरोखर तू माझा जीव वाचवला आणि आजपर्यंत मला साथ देत आला आहेस. गेली पंधरा वर्षं आपण एकत्र आहोत. कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा क्षण तुझ्या पाठिंब्याशिवाय अनुभवणे शक्य नव्हते.”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले, “मला पुढे जाण्यासाठी आणि माझी स्वप्न साकार करण्यासाठी तू केलेली लढाई ही एका वेगळ्या स्तरावर नि:स्वार्थीपणाची आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद!” तर यावर डॅनियलने देखील कमेन्ट करत सनीचे कौतुक केले आहे. “आज तुझ्याकडे जे आहे ते तू स्वतः कमवले आहे. माझ्याबरोबर किंवा माझ्याशिवाय.. माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. ही फक्त सुरुवात आहे,” असे डॅनियलने म्हंटले आहे.
या पोस्टसह सनीने कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवरील एक व्हिडिओही शेअर केला आहे. दरम्यान, सनी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘कॅनेडी’ चित्रपटात दिसणार आहे.




