Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अखेर दिलासा! 140 मतांनी आघाडी
Updated On:

गोवा – पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये कोणते पक्ष सत्ता स्थापन करतील हे पाहणं महत्वाचं असेल. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
साखळी मतदारसंघातून अखेर 140 मतांनी आघाडीवर आहे. तर, काँग्रेस उमेदवार धनेश सगलानी हे पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर पणजीमध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपचे बाबुश मोन्सरात यांना 2981 मते असून, अपक्ष उत्पल पर्रिकर यांना 2647 मते मिळाली आहेत.





