Sanjay Singh : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने दाखल केला मानहानीचा खटला; संजय सिंह यांना न्यायालयाची नोटीस

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा यांनी आपचे नेते आणि खासदार संजय सिंह यांच्या विरोधात 100 कोटी रूपयांचा मानहानीचा खटला दाखल केला. त्यावरून गोव्यातील न्यायालयाने सिंह यांना नोटीस बजावली. त्यांच्याकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे. भाजपची सत्ता असणाऱ्या गोव्यात पैशांच्या बदल्यात नोकरी घोटाळा घडल्याचा आरोप होत आहे.
सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या आमीषातून काही जणांनी लाखों रूपये उकळल्याच्या तक्रारी अनेक तरूणांनी केल्या आहेत. त्यावरून गोव्यातील राजकारण तापले आहे. अशात सिंह यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी गोव्यातील घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सामील असल्याचा आरोप केला. त्यावरून सुलक्षणा यांनी सिंह यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली.
सिंह यांनी केलेला आरोप खोटा आणि बदनामीकारक आहे. त्याबद्दल त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले जावेत. तसेच, त्यांना आरोपाशी संबंधित वक्तव्ये करण्यापासून रोखावे, अशी विनंती सुलक्षणा यांनी न्यायालयाला केली आहे.





