Deepika Padukone | Prabhas | Spirit | Sandeep Reddy Vanga : अॅनिमल चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा त्यांचा आगामी ‘स्पिरिट’ चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटावर काम सुरू झाले असून दाक्षिणात्य अभिनेता प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट पोलिसांवर आधारित अॅक्शन थ्रिलर स्पस्पेन्स चित्रपट असणार आहे. या चित्रपटात प्रभास स्टंट करताना पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘कबीर सिंग’, ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘ॲनिमल’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. त्यांचे चित्रपट गेल्या काही वर्षात चर्चेचा विषय ठरले. आता ते प्रभाससोबत ‘स्पिरिट’ नावाचा चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण मुख्य अभिनेत्री होती. पण आता ती या चित्रपटाचा भाग नाही. तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. नेमकं झालं असं की, दीपिकाच्या काही वागण्यामुळं देखील आणि नको त्या मागण्यांमुळं वांगा नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. आणि त्यामुळंच तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दीपिकाच्या नको त्या मागण्या…. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाने दिग्दर्शकाला चित्रपटासाठी 8 तास काम करण्याची मागणी केली होती. पण निर्मात्यांना अभिनेत्रीसाठी फक्त 6 तासांचे शूटिंग योग्य वाटत होतं. याशिवाय, तिची मागणी अशी होती की दीपिकाने या चित्रपटासाठी तब्बल 20 ते 30 कोटी मागितल्याचं म्हटलं एवढंच नाही तर फीससह, ती चित्रपटाच्या नफ्यातही वाटा मागत होती. अभिनेत्रीने निर्मात्यांसमोर तेलुगू भाषेत डबिंग न करण्याची अट ठेवली होती. दीपिकाच्या एवढ्या मागण्या ऐकून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा देखील नाराज झाले. त्यानंतर त्यांनी दीपिकाला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.