‘सत्यप्रेम की कथा’चा जागतिक स्तरावर जलवा; कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, आकडा ऐकून….

मुंबई – अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘सत्या प्रेम की कथा’ बॉक्स ऑफिसवर आणि तसेच प्रेक्षकांच्या मन जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. प्रेक्षकांच्या प्रेमावर आणि तोंडी सकारात्मक शब्दावर स्वार होऊन, चित्रपटाने सोमवारी 2 कोटींचा गल्ला जमवला, भारतात त्याची एकूण कमाई 68.06 कोटी झाली आणि जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला असल्याचं समोर आलं आहे.
पहिल्या दिवशी 9.25 कोटींच्या कलेक्शनसह दमदार सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी 7 कोटींचा गल्ला जमवला, त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 10.10 कोटींचा गल्ला जमवला. रविवारी चौथ्या दिवशी त्याचे कलेक्शन 12.15 कोटींसह वाढतच राहिले.
यानंतर, पाचव्या दिवशी, चित्रपटाने 4.21 कोटी कमावले आणि सोमवारच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तर सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चित्रपटाने 4.05 कोटींची कमाई केली. त्याच वेळी, चित्रपटाने बुधवारी म्हणजे 7व्या दिवशी 3.45 कोटींसह 50 कोटींचा टप्पा पार केला. आता सोमवारी चित्रपटाने 2 कोटींचा गल्ला जमवला असून यासोबतच 12 दिवसांची एकूण कमाई 68.06 कोटी झाली आहे.
‘सत्यप्रेमची कथा’ समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केली आहे. चित्रपटाची कथा करण श्रीकांत शर्मा यांनी लिहिली आहे. नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला, शरीन मंत्री आणि किशोर अरोरा यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांची रोमँटिक केमेस्ट्री दाखवण्यात आली आहे.





