ग्लॅमरस लूक आणि हटके कॅप्शन….अंकिता लोखंडेचा मालदीव बीचवर बेभान डान्स व्हायरल, ‘मेरे रंग में’ गाण्यावर धरला ठेका

Ankita Lokhde : टीव्ही मालिकाविश्वात आपला मोठा चाहतावर्ग असणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हि सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. अंकिता हि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करत असते. तसेच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत ती चर्चेत देखील असते. सध्या अंकिता तिच्या नवऱ्यासोबत सुट्टीचा आनंद एन्जॅाय करण्यासाठी मालदीप व्हेकेशन ट्रिपवर गेली आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ती मालदीवच्या समुद्रकिनारी बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे.
अंकिता लोखंडे हि तिच्या पतीसोबत मालदीप ट्रिपवर आली असून, येथील ट्रिपचे काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामच्या अकाऊटवरून शेअर केले आहेत. नुकताच तिने तिचा मालदीवच्या बीचवर मेरे रंग में रंगने वाली या सुपरहिट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष अंकिताकडे वेधले आहे. तिने या व्हिडिओत पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तसेच मोकळे केस, मिनिमल ज्वेलरी आणि मेकअपने तिने ग्लॅमरस लूकने ती खुलून दिसत आहे. अंकिताने या व्हिडिओला हटके कॅप्सन देखील दिले आहे. “लाटांच्या तालावर नाचणारा एक आत्मा, जिथे प्रत्येक पाऊल स्वातंत्र्य आणि शांतीचा आवाज करतं…” तिचा डान्स करतानाचा हावभाव स्टेप्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.





