nagar | ३० ते ५० टक्के नफा देतोम्हणत ३० लाखांना गंडविले

नगर, (प्रतिनिधी) – शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास ३० ते ५० टक्के जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अनोळखी व्हाट्सअपधारकांने नगरमधील व्यक्तीची २९ लाख ९९ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केली. याबाबत संबंधित व्यक्तीने हॉटस्अपधारकांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नगरच्या स्टेशन रस्त्यावरील आनंदनगर भागात राहतात. त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष एका अनोळखी व्हाट्सअप वरील व्यक्तीने दाखविले. फिर्यादी यांना त्या व्यक्तीने शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूकीतून ३० ते ५० टक्के ज्यादा नफा मिळवून देण्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतविले. दरम्यान, ११ फेब्रुवारी २०२४ ते १० मार्च २०२४ या कालावधीत फिर्यादी यांनी त्या व्यक्तीकडे एकूण २९ लाख ९९ हजार ९९८ रुपयांची गुंतवणूक केली. त्या व्यक्तीने फिर्यादी यांना जादा नफा दिला नाही व गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.





