“आम्हाला एक खून माफ करा”; रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत का केली अशी मागणी?

Rohini Khadse | आज जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केली आहे. एक खुन माफ करण्यात यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे थेट पत्राद्वारे केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे. मात्र त्यांनी अशी आगळीवेगळी मागणी करण्याचे नेमकं कारण काय? तर महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांवर संताप व्यक्त करत रोहिणी खडसेंनी ही मागणी केली आहे.
रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या?
रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे. Rohini Khadse |
आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, 12 वर्षीय! विचार करा काय परिस्थिती असेल? नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे, अशा बातम्या आम्ही वाचल्या. Rohini Khadse |
मा. द्रौपदी मूर्मू
राष्ट्रपती, भारत @rashtrapatibhvnविषय :- एक खुन माफ करणेबाबत
महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा… pic.twitter.com/bE8JMogdZ7
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 8, 2025
सर्व्हेनुसार भारत सर्वात असुरक्षित देश
या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हेनुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा, अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.
हीच जागतिक महिला दिनाची भेट समजू
अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा आम्हाला खून करायचा आहे. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती. मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
12 वर्षीय शाळकरी मुलीवर लैगिंक अत्याचार
दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय शाळकरी चिमुरड्या मुलीवर पाच नराधमांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली होती. पीडित मुलगी जोगेश्वरीत नातेवाईकांसोबत राहते. मात्र 24 फेब्रुवारी रोजी ती बेपत्ता झाली होती. मुलगी एकटी असल्याचं बघून हे नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी नेले आणि या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सापडली. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर पाच जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली.
हेही वाचा:




