“यंदाही सुप्रियाला संधी द्या” ; बारामतीत शरद पवार यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

बारामती : बारामतीकरांनी संधी दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत आवाज उठविला. संसद रत्न पुरस्कार मिळवून त्यांनी बारामतीचा नवलौकिक वाढवला आहे. यंदाही सुप्रियाला संधी द्या असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी केले आहे.
बारामती स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले यापूर्वी सुप्रिया सुळे यांना आपण संधी दिली. त्यामुळे त्या खासदार झाल्या आणि त्यांच्या हातून चांगले काम झाले यंदाही सुप्रिया यांनाच संधी द्या तुतारी वाला माणूस हे चिन्ह आपल्याला निवडणूक आयोगाने दिला आहे.
ते चिन्ह लक्षात ठेवा. एकजुटने काम करण्याची ही वेळ आहे. व्यापाऱ्यांच्या आणि अडचणी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. इथून पुढील काळात देखील याबाबत आपण प्रयत्नशील राहू.
निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत बैठक घेऊ अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करू असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.





