“मला गालावर KISS दे’…’, अभिजीत बिचुकलेनं व्यक्त केली अनोखी Fantasy

मुंबई – बिग बॉस म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करणाऱ्यांची जत्रा.. इथे साळसूद किंवा नॉन ग्लॅमरस माणसांना अजिबात एन्ट्री मिळत नाही… इथे तुम्ही जितके डँबिस… तितके हिट… असंही समीकरण आहे. आणि या समीकरणाला साजेसा असा एक माणूस नुकतचा हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केला आहे.
हा कुणी साधा-सुद्धा माणूस नसून ही एक अष्टपैलू व्यक्ती आहे. असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ यांनी आता सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस 15’ मध्ये एन्ट्री केली आहे.
घरामध्ये अभिजित आणि देवोलीना भट्टाचार्जी नेहेमीच एकत्र दिसून येतात. मात्र, आता अभिजीतने देवोलिनाकडे एक भलतीच मागणी केली आहे. त्यामुळे ती बिचुकलेवर चांगलीच भडकली आहे. अभिजित बिचकुले यांनी देवोलीनाकडे किसची मागणी केली असून, त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ ‘बिग बॉस’च्या एका फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका टास्क दरम्यानचा आहे. यात स्पर्कांना सामानाची चोरी करायची असते. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिजीत आधी देवोलीनाचे गाल ओढतो आणि बोलतो, “माझ्याकडे खूप सामान आहे. मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण मला एक किस पाहिजे.
हे ऐकल्यानंतर देवोलीना संतापते आणि नाही बोलते. तर अभिजीत बोलतो मी मदत करणार नाही. हे ऐकल्यानंतर देवोलीना त्याच्यावर आणखी भडकीती आणि बोलते तू माझ्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नकोस… आणि तुझी हद्द पार करू नको.





