नेवासा – शहापूर – घोटी – विशाखापट्टणम राज्यमार्ग क्रमांक ५० अकोले,संगमनेर,श्रीरामपूर तसेच नेवासा – शेवगाव – गेवराई मार्गे विशाखापट्टणम या राज्य मार्गाला राष्ट्रिय महामार्गाची परवानगी देवून या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्याची आग्रही मागणी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पावसाळी अधिवेशनात केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी रेल्वे सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यावेळी उपस्थित होते. यावेळी खासदार वाकचौरे यांनी केंद्रिय रस्ते वाहतूक मंञी नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा महामार्ग पाठारी भागातून जात असल्याने अवजड वाहतूक करणारे ट्रक – कंटेनर तसेच साखर कारखानदारीमुळे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच हा राज्यमार्ग शिर्डी – शनिशिंगणापूर तसेच देवगड आणि नांदेड माहूर तिरुपती बालाजी सारख्या तीर्थक्षेत्रांना जोडतो त्यामुळे खाजगी वाहनांची तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते. हा राजमार्ग ज्या भागातून जातो तो भाग औद्योगिक व कृषी क्षेत्राशी निगडित असल्यामुळे या क्षेत्राशी निगडित असलेल्या कच्च्या मालांची वाहतुकीही मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे सध्याचा रस्ता हा अपुरा पडत आहे. या अपुऱ्या रस्त्यामुळे दररोज अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून अनेक निरापराधांचा मृत्यु होत आहेत. तसेच अनेकांना या अपघातातून अपंगत्व आलेले आहे. तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हा रस्ता प्रमुख राज्य मार्ग असल्यामुळे या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. असेही खासदार वाकचौरे यांनी केंद्रिय रस्ते वाहतूक मंञी नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात नमूद म्हटले आले आहे. या रस्त्याची परिस्थिती पाहता या मार्गाला तातडीने चौपदरीकरण करण्याची मंजुरी आपण द्यावी अशी एकमुखी मागणी खासदार वाकचौरे यांनी केली याबाबत खासदार वाकचौरे यांनी दिलेल्या निवेदनावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे शहापूर – घोटी – विशाखापट्टणम महामार्गाला मंजरी मिळून दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे वाकचौरेंच्या कार्यपद्धतीवर जनतेतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. शहापूर – घोटी – विशाखापट्टणम राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे सुतोवाच मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे आणि बेलापूर – परळी या रेल्वे मार्गावरील राज्यमार्ग हा शिर्डी मतदार संघातील वैभवात मोठी भर घालणारा ठरणार आहे भाऊसाहेब वाकचौरे. खासदार .शिर्डी