“गुलाब ऐवजी द्या हिरवेगार रोप’; “व्हॅलेन्टाईन डे’ला अनोखी मोहिम

कृष्णगिरी – केरळमधील लोक निसर्गाच्या सानिध्यात आहेत. याच कारणामुळे त्यांची विचार करण्याची पद्धतही देशातील इतर राज्यातील नागरिकांपेक्षा थोडी वेगळी आहे. या “व्हॅलेंटाईन डे’ला ते गुलाबाऐवजी हिरवे रोप भेट देण्याचा ट्रेंड आणत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रोपवाटिकांच्या मालकांची मने प्रफुल्लीत होत आहेत.
कृष्णगिर जिल्ह्याच्या डेंकन्निकोट्टई तालुक्यातील ज्वालागिरीजवळील आगलाकोट्टई या छोट्याशा गावाची लोकसंख्या 1035 आहे. इथले लोक पूर्वी नाचणी, ज्वारी किंवा बाजरी पिकवत असत. त्यानंतर येथे रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू झाला. रोपवाटिकेचा व्यवसाय करणारे एस. भैरव मूर्ती सांगतात, “माझे काही नातेवाईक उदरनिर्वाहासाठी केरळमध्ये स्थलांतरित झाले होते. ते परतल्यानंतर आमचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आम्ही स्वतःची रोपवाटिका सुरू केली.
आगलाकोट्टई ग्रामस्थांचा आता रोपवाटिका हा मुख्य व्यवसाय झाला आहे. सुरुवातीला येथे तीन रोपवाटिकाच होत्या. त्या आता वाढून साठ झाल्या आहेत. आगलकोट्टईचे यश पाहून इतर गावातील शेतकऱ्यांनी नाचणी किंवा इतर पिके घेणे बंद करून नियमित उत्पन्न देणारा रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे.
आनखी एक रोपवाटीका व्यावसायिक श्रीनिवासन म्हणतात, “शेजारील राज्यातील लोकांना वनस्पतींनी परिसर हिरवागार ठेवायचा असल्याने ते केरळमधून त्यांच्या गावी परतले आणि त्यांनी तेथे रोपवाटिका सुरू केली.”
श्रीनिवासन यांच्या मते, डेन्कन्निकोट्टई तालुक्यात नर्सरींची मोठी संख्या आहे. प्रत्येक रोपवाटिका दरमहा किमान 5 हजार रोपे लावते आणि किमान मासिक उलाढाल 50 हजार रुपये आहे. तर जगतो रंजिता सांगते की, पूर्वी नियमित उत्पन्न नव्हते, तेव्हा गावातून स्थलांतर व्हायचे. आता आम्ही बाहेरच्या लोकांना काम देण्याच्या स्थितीत आहोत.
त्यामुळे या सर्वांनी आता मोहिम सुरु केली आहे की, येत्या व्हॅलेन्टाईन डेला युवक युवतींनी एकमेकांना गुलाबपुष्प न देता, एखादे हिरवेगार रोप द्यावे आणि निसर्ग रक्षणासाठी आपला हातभार लावावा.




