Amruta Khanvilkar: गर्ल्स गँग इटलीत! ‘आम्ही तीन तिघी’ म्हणत अमृताने शेअर केले फोटो
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे या तिघी सध्या इटलीत

Amruta Khanvilkar: मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन देखील खूप चांगल्या मैत्रीणी आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, सोनाली खरे, प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक यांची मैत्री चर्चेत असते. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान, अमृताने आम्ही चौघी बेस्ट फ्रेंड्स असून आमची गर्ल्स गँग असल्याचे म्हंटले होते.
आता याच गर्ल्स गँगबरोबर अमृता फिरायला गेली आहे. अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे या तिघी सध्या इटलीला फिरायला गेल्या आहेत. या ट्रिपचे फोटो अमृताने स्वतः शेअर असून फोटोच्या खाली “आम्ही तीन तिघी” असे लिहिले. अमृताने पिझ्झा, पास्ता, तिरामिसू असं लिहीत एक हिंट दिली होती, त्यावरुन ती इटलीला गेल्याचे समजले.
बॅगांमुळे अमृता वैतागली
इटलीला पोहोचल्यावर अमृताने एक गंमतशीर व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओत तिघी स्वतःच्या बॅगा ओढताना दिसत आहेत. अमृता म्हणते, “तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल, स्वतःचं सामान उचलून प्रवास करायचा. तेच आम्ही करतोय आता. आम्ही आता बसने फ्लोरेन्सला चाललोय. या बॅगांचं काय सांगू? बॅगांनी पुरता दम काढलाय आमचा.” तिचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, आता अमृता, नेहा आणि सोनाली या तिघीजणी इटलीत काय धमाल करणार हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. परंतु सध्या या मैत्रिणींची इटली ट्रीप अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा:




