मुंबई – बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी हे इंडस्ट्रीतील फेवरेट कपल पैकी एक आहे. हे कपल अनेक वेळा एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिशा आणि टायगर रिलेशनशिप मध्ये आहेत. फॅन्स देखील या जोडीवर भरभरून प्रेम करतात.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री दिशा पाटनी आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. दिशा चित्रपटातील तिच्या भूमिकामुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड सक्रिय असते. अनेकदा तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते.
नुकतीच दिशा पाटनीनं बॉयफ्रेंड टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट ‘हिरोपंती-2’ च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
‘हिरोपंती-2’च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी दिशानं लव्हेंडर कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती. मात्र या स्क्रिनिंगच्या वेळचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तिच्या लुकवरून काही युजरनी तिची खिल्ली उडवली आहे.
View this post on Instagram
कॅमेऱ्यासमोर पोज देत असतानाचा दिशाचा हा व्हिडिओ असून, यामध्ये तिचा लूक खूपच वेगळा आणि बदलेला दिसत आहे. व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी तिच्या लूकवर निशाणा साधला आहे.
एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘आता ही देखील लिप सर्जरी करून आली आहे.’, तर दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली, ‘नोज जॉबनं हीचा चेहरा देखील वाणी कपूर प्रमाणेच खराब करून टाकला आहे.’ या आशयाच्या अनेक कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.