एका बाजूला गर्लफ्रेंड, दुसऱ्या बाजूला मुलगा; ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर नेमकं काय घडलं?

Girlfriend Gauri Spratt : २० जून म्हणजेच आज बॅालीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच्या बहुचर्चित ‘सितारे जमीन पर’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काल या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला बॅालीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. चित्रपटाचे स्क्रिनिंग झाल्यानंतर आमिरसोबत कलाकारांनी फोटोशूट केले. या स्पेशल स्क्रिनिंगला आमिरची गर्लफेंड गौरी स्प्राटने देखील हजेरी लावली होती.
आमिर आणि गौरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्राटचा हात धरून पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. गौरी आमिसोबत फोटोसाठी पोझ देत असतानाच त्यावेळी आमिर त्याच्या मुलाला आझादला हाक मारतो. यानंतर तिघांनी एकत्रित पोज देत फोटोशन केले आहे. एकीकडे गर्लफ्रेंड आणि दुसरीकडे किरव राव आणि आमिरचा मुलगा आझाद दिसत आहे.
View this post on Instagram
आमिराने पारंपारिक पद्धतीमधील जोधपुरी पांढऱ्या सफारी सूट परिधान केलेला आहे. गौरी स्प्राट हिने हिरव्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. तर आमिरचा मुलगा आझाद याने काळ्या रंगाचा सुट परिधान केला आहे, असे व्हायरल झालेल्या व्हि़डीओत दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
क्यूट कपलचीही हजेरी
सितारे जमीन पर या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने स्क्रिन शेअर केली आहे. या स्क्रिनिंगला जेनेलिया ही तिचा पती रितेश देशमुखसोबत पोहचली होती. दोघांनही पापाराझींनी पोज देत फोटोशूट केले. दोघांनी एकाच म्हणजेच पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. रितेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता तर जेनेलियाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. दोघेही खूप क्यूट दिसत होते.
हेही वाचा :“भाजप FIR चा खेळ खेळतोय”; एसीबीच्या चौकशीवर मनीष सिसोदियांचा संताप





