Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान वाद; बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने सरकारी महिला कर्मचारीने विचारला जाब
Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वाद

Girish Mahajan : प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणादरम्यान गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नसल्याचा आरोप करत एका महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला.
गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत आहे. त्यांनी जाब विचारताच उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. माधवी जाधव यांनी पुढे सांगितले की, “बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते.
पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नाव भाषणात का नाही?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. Girish Mahajan :
Health & Fitness: बाजरी का मानली जाते सुपरफूड? ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले फायदे
View this post on Instagram
“सस्पेंड केलं तरी चालेल, पण माफी मागणार नाही”
घटनास्थळी झालेल्या वादानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव म्हणाल्या की, “पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.
मी मीडियाशी घेणं-देणं ठेवत नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी,” असे देखील त्यांनी म्हटले. Girish Mahajan :
हेही वाचा:
Eknath Shinde : “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण…”; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास





