Eknath Shinde : “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण…”; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात झेंडावंदन करत जनतेशी साधला संवाद

Eknath Shinde : भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात झेंडावंदन करत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ता, संघर्ष आणि राजकारणापेक्षा राज्य आणि देश महत्वाचा असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी, देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून संविधानाच्या मूल्यांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करत महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहील. तसेच झोपडपट्टी मुक्त शहरे आणि मेट्रोचे जाळे विणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
ठाण्यात २६० मीटर उंचीचा ‘व्ह्यूइंग टॉवर’ उभारला जाणार असून तो शहराची नवीन जागतिक ओळख ठरेल. उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना ठाण्याला विकासाच्या आघाडीवर आणल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ता संघर्षाच्या राजकारणापेक्षा देश मोठा
दरम्यान, “सत्ता संघर्षाच्या राजकारणापेक्षा देश मोठा असतो. संविधानामुळेच प्रत्येक नागरिकाला न्याय आणि स्वातंत्र्य मिळाले आहे. विकास हाच सरकारचा मुख्य अजेंडा आहे. मराठी माणसाची ताकद फक्त मुंबईपुरती मर्यादित नसून चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठी माणसाचे साम्राज्य आहे,” असे सांगत त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला.
हेही वाचा:
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन






