गिरीश बापटांचा नारायण राणेंना घरचा आहेर
Updated On:

पुणे – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे सेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. असे असताना भाजप राणेंच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसून आले मात्र भाजप नेते गिरीश बापट यांनी राणे यांना घरचा अहेर दिला आहे.
गिरिश बापट म्हणाले की, राजकीय पक्षात मतभेद असतात. पण बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, त्यामध्ये सर्वच पक्षांचा समावेश आहे. मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याचे वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले होते.





