‘राहुल गांधींनी शेण आणि वाळू खाऊन प्रायश्चित्त करावं…’ ; गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल

Giriraj Singh on Rahul Gandhi । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज सोमवारी एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर येत आहेत. त्या अगोदर, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. टीका करताना त्यांनी प्रथम बेगुसरायमधील सिमरिया घाटावर येऊन गायीचे शेण आणि वाळू खावी आणि गंगाजीची माफी मागावी आणि प्रायश्चित्त करावे.” असे म्हटले आहे.
गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याअगोदर त्यांच्यावर टीका करताना, “त्यांचे वडील राजीव गांधी यांनी बेगुसरायमध्ये पेट्रोकेमिकल्स प्लांट उघडण्याची घोषणा केली होती, जी आजपर्यंत उघडण्यात आलेली नाही. बंद पडलेला खत कारखाना आता सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगा नदीवरील १७ पुलांचे उद्घाटन केले.” असे म्हटले आहे.
‘गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका’ Giriraj Singh on Rahul Gandhi ।
पटना याठिकाणी माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी,”त्यांनी गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न करू नये. पंतप्रधान मोदींनी केवळ बिहारचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा विकास केला. ” असेही म्हटले. पुढे ते म्हणाले की, “राहुल गांधींनी आधी काँग्रेसने या देशात ६० वर्षांच्या राजवटीत किती लोकांना रोजगार दिला याचे आकडे द्यावेत. त्यांच्या कार्यांमुळे निर्माण झालेली पोकळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरून काढली आहे.” असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.
‘राहुल गांधींना पश्चाताप करावा’ Giriraj Singh on Rahul Gandhi ।
पुढे केंद्रीय मंत्री सिंह यांनी, “आज देशातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी ‘आधी रोटी खायेंगे-इंदिरा को लायेंगे’ असा नारा दिला होता. इंदिरा सत्तेत आल्या पण देश गरीब होत गेला. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींनी लोकांना घरे, वीज, शौचालये, गॅस स्टोव्ह आणि अन्नधान्य दिले. राहुल गांधींनी तपश्चर्या करावी.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी म्हणजेच आज पाटणा याठिकाणी भेट देणार आहेत आणि तीन कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. ते प्रथम बेगुसराय येथे ‘स्थलांतर थांबवा, नोकरी द्या’ रॅलीत सहभागी होतील आणि त्यानंतर ते पटना येथे संविधान परिषदेत सहभागी होतील. यानंतर ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील.
हेही वाचा
अग्रलेख : भारत-श्रीलंका मैत्री





