‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेच्या शुटींगदरम्यान गिरीजा प्रभूला झाली दुखापत

Girija Prabhu | अभिनेत्री गिरीजा प्रभू लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र एका सीनच्या शुटींगदरम्यान तिला दुखापत झाली आहे. गिरीजा प्रभू यात एका जत्रेत लाठीकाठी करताना दाखवण्यात आली आहे. परंतु शुटिंगदरम्यान गिरीजा प्रभू हिला काठी चेहऱ्यावर लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेचं शुटिंगही सुरु आहे. दरम्यान या मालिकेत गिरीजा प्रभू हिचा वेगळा अंदाज दाखवण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गिरीजाला लाठीकाठी करताना दुसऱ्या एका व्यक्तीची काठी डोळ्याला लागली. यामुळे तिच्या चेहऱ्यावर सूज आली आहे. चेहरा सुजल्यामुळे व्हिडिओमध्ये ती चेहरा शेकताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. Girija Prabhu |
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये गिरिजा म्हणतेय की, ‘कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचं शुटिंग सुरु असताना आम्ही जत्रेचा सीक्वेन्स शुट करत होतो. त्यावेळी माझा लाठीकाठी करतानाचा सीन होता. सीन शुट करत असताना मला काठी लागली आणि माझ्या चेहऱ्याला सूज आली. माझ्या पहिल्या एपिसोडची ही आठवण आहे. पण काही असो, मला फार छान वाटतय, मजा पण येतेय. काहीतरी वेगळं करतेय. मला वाटतं की, आपण एखाद्या कलाकृतीचा आनंद घेतो, तेव्हा ती नक्कीच प्रेक्षकांना आवडते.”
दरम्यान, याआधी अभिनेत्री गिरीजा प्रभू व मंदार जाधव हे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत एकत्र दिसले होते. या कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या नवीन मालिकेतून ही लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Girija Prabhu |
हेही वाचा:
पाकिस्तानला भरली आणखी धडकी ! भारत फ्रान्सकडून खरेदी करणार २६ ‘राफेल-एम’ ; ६३ हजार कोटींचा करार



