‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं शुटींग एकदा पहाच…

मुंबई- स्टार प्रवाहवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं” ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. त्यातील गौरीच्या भूमिकेला महाराष्ट्रानं प्रेम दिलं आहे. लॉकडाऊनंतर सुरु झालेली मालिका कमी काळात प्रकाशझोतात आली.
या मालिकेचे DOP मोहित जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मालिकेच्या शुट दरम्यानचे हेकाही व्हीडियो पोस्ट केले आहेत. त्यात सेटवरील मजा, शुट कसं केलं जातं, त्यात किती सामान किंवा कॅमेरे असतात हे सगळं बघायला मिळतं.
अभिनेत्री वर्षा उसगावकरने या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅॅक केलं. आईसाहेबांची भूमिका त्या उत्तमरित्या निभावत आहे. गौरीच्या भूमिकेत असलेली गिरीजा प्रभू अत्यंत साधी मुलगी दाखवली आहे. मात्र गिरीजा ही उत्तम डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विनमध्ये तिचे बहारदार नाच बघायला मिळाला.





