निळ्या रंगाच्या साडीत कमालीची सुंदर दिसते ‘गिरिजा ओक’; अभिनेत्रीचा प्रसन्न मूड पाहून फॅन्स झाले खुश !

Updated On:
Photo 1

मुंबई – मराठी आणि हिंदी मालिका-चित्रपट आणि रंगभूमी गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे “गिरिजा ओक-गोडबोले’. सौंदर्याबरोबरच आपल्या अभिनयाच्या बळावर गिरिजा ओकने चित्रपट सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटातून गिरिजाच्या हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या भूमिका आहेत. त्यानंतर गिरीजा गुलमोहर, हाऊसफुल, लज्जा इत्यादीसह इतर अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली.

गिरिजा वयाच्या 15 व्या वर्षापासून अभिनयाच्या क्षेत्रात असून तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. गिरिजा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या आहे. गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही ग्लॅमर्स फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतंच गिरिजा ओकनं इंस्टाग्रामवर स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले असून, तिच्या या मादक लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर अक्षरशः कमेंटचा वर्षाव केला आहे. निळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाउज तिने परिधान केला आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सुंदर साडीतील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या साडीत गिरिजाच्या सौंदर्याला चार चांद लागले असून, ती अतिशय मादक दिसत आहे. अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावर ग्लॅमर्स फोज देताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका