इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी भारतीयांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; हटके अंदाजात म्हणाल्या…

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीयांना ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत xवर एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी भारतातील लोकांना आणि विशेषत: या पेजला फाॅलो करणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. इटली आणि भारत यांच्यात मजबूत संबंध आहेत आणि मला खात्री आहे की एकत्रितपणे आम्ही चांगले परिणाम साध्य करू. आमचे धोरणात्मक सहकार्य हा भविष्यातील महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
In occasione del 78° Giorno dell’Indipendenza, desidero esprimere i miei più sinceri auguri al popolo indiano, e in particolare ai molti indiani che seguono questa pagina. Italia e India condividono un legame sempre più forte, e sono certa che insieme raggiungeremo grandi… pic.twitter.com/DG8Ujo03Co
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) August 15, 2024
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनीही दिल्या शुभेच्छा –
संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले, ‘आज भारत अभिमानाने आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, जो देशाच्या अतुलनीय विकास प्रवासाचा पुरावा आहे. यानिमित्त मी माझे मित्र नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपली मैत्री मजबूत करण्यासाठी, आमचे द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी आणि आमच्या शाश्वत भागीदारीच्या सर्व पैलूंमध्ये मजबूत संबंध वाढवण्यासाठी UAE समर्पित आहे. आमच्या भारतीय मित्रांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुभेच्छांसह भारत दौरा आठवला –
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी X वर लिहिले, ‘सर्व भारतीयांना 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जानेवारीमध्ये माझ्या भारत भेटीदरम्यान तुम्ही केलेले स्वागत मला आठवते आणि माझे मित्र नरेंद्र मोदींसोबत आमच्या धोरणात्मक भागीदारीसाठी निश्चित महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मी उत्सुक आहे. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक देशांच्या नेत्यांनी पीएम मोदी आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.





