नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुलामनबी आझाद यांची पुढील रणनिती काय असेल या विषयी अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहे. तथापि त्यांच्या काही निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ते स्वत:चा नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेस मध्ये 50 वर्ष विविध पदे भुषवल्यानंतर त्यांना भाजप मध्ये जाणे प्रशस्त ठरणार नसल्याने त्यांनी या पर्यायाचा विचार सुरू केल्याचे सांगण्यात येते.
भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक – शिवसेना
जम्मू काश्मीरात आता निवडणूका होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत:च्या पक्षाकडून तेथे उमेदवार उभे करून पहिली चाचपणी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. कॉंग्रेसने त्यांना पक्षासाठी जम्मू काश्मीरात काम करण्याची सूचना केली होती. पण त्यांना राज्यसभा हवी होती. सतत राज्यसभेत संधी देऊन दिल्लीत बसून राजकारण करण्यापेक्षा पक्षाच्या अडचणीच्या काळात प्रत्यक्ष मैदानावर जाऊन काम करण्याचा त्यांना कॉंग्रेसने दिलेला सल्ला मानवला नाही असेही सांगण्यात येत आहे.
देशातील सर्व टोलनाके होणार हद्दपार – नितीन गडकरी